file photo

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- अहमदनगरचे पालकमंत्री व राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर नेमके कोणते उपचार सुरु आहेत याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाही.

दरम्यान हसन मुश्रीफ यांनी नुकतीच पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबावर 127 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोपांची मालिका चालूच ठेवली आहे.

आधी 11 जणांवर थेट आरोप केल्यानंतर सोमय्यांनी यामध्ये आता आणखी एका मंत्र्यांचं नाव घेतलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे.

इतकंच नाही तर सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत. मुश्रीफ कुटुंबाने 127 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. आरोप तथ्यहीन तथ्यहीन आरोप करून किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी कडून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्याचा आपण निषेध करीत असून मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांची बदनामी सहन केली जाणार नाही.

कोल्हापूर जिल्ह्याचे नेते म्हणून व महाविकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोतच, तसेच महाविकास आघाडी सरकार देखील मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या मागे खंबीरपणे ऊभे राहील अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे,

स्वतःच्या कर्तुत्वाने जनमानसात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून जनतेची सेवा करणाऱ्या नेतृत्वाला अशा पद्धतीने बदनाम जर केले जात असेल तर ही बाब कोल्हापूरची जनता कधीही सहन करणार नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांची कार्यशैली मी जवळून पाहिली आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करणे थांबवावे, कोल्हापूर जिल्ह्यातील जनता आरोप करणाऱ्यांना कधीच माफ करणार नाही असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी पत्रकात म्हटले आहे.