Maharashtra news : पीक विमा आणि अन्य प्रश्नांसाठी ८ जूनपासून बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथून आंदोलन सुरू करण्याचा इशारा किसान सभेतर्फे देण्यात आला आहे.
किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी ही माहिती दिली. पुणतांबा येथे एक जूनपासून किसान क्रांतीच्या झेंड्याखाली शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. याच दरम्यान राज्यात आणखी एक शेतकरी आंदोलन सुरू होत आहे.
बीड जिल्ह्यातील परळी येथे ८ जून २०२२ रोजी पत्रकार व पीक विम्याचे अभ्यासक पी. साईनाथ यांच्या उदघाटनपर भाषणाने परिषद सुरू होईल. त्यातूनच या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे.
या परिषदेसाठी राज्यभरातील किसान सभेचे सर्व प्रमुख नेते व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधून शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. परळी येथील परिषद झाल्यानंतर राज्यातील सर्व प्रमुख विभागांमध्ये अशा प्रकारच्या परिषदा घेऊन व्यापक शेतकरी आंदोलन उभे करण्याच्या बद्दल नियोजन करण्यात येणार आहे.
पीक विमा कर्जमुक्ती, खरीप तयारी, वीजबिल मुक्ती, शेतीमालाला भाव या प्रमुख मागण्यांसाठी किसान सभेने राज्यभर रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष Dr. Ajit Navale, Beed, p. Sainath, Dr. Ashok Dhawale यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या ऑनलाइन बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.