मोठी बातमी! अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न एका अज्ञात व्यक्तीनं केला आहे. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखलं.

अज्ञात व्यक्ती कार घेऊन डोवालांच्या निवासस्थानी शिरण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

यावेळी बंगल्याच्या सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान दाखवत या व्यक्तीला रोखलं आणि मोठा अनर्थ टळला. या व्यवक्तीला सध्या दिल्ली पोलिसांच्या विशेष तुकडीच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, अजित डोवालांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं पोलीस चौकशीतून समोर आलं.

त्याच्याकडे असलेली कार त्यानं भाड्यानं घेतली होती, असाही तपशील प्राथमिक चौकशीतून समजला आहे. पकडला गेल्यानंतर तो काहीतरी बडबडत होता.

माझ्या शरीरात कोणीतरी चीप लावली आहे. मला रिमोट कंट्रोलनं चालवण्यात येत आहे, असं तो म्हणत होता. मात्र त्याच्या शरीरात कोणतीही चीप आढळून आलेली नाही.

सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलेली व्यक्ती कर्नाटकच्या बंगळुरूत वास्तव्यास आहे. दिल्ली पोलिसांची विशेष शाखा, दहशतवादविरोधी पथक त्याची चौकशी करत आहे.

त्याला लोधी कॉलनीतील स्पेशल सेलच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आलं आहे. नेमके कोण आहेत अजित डोवाल? जाणून घ्या अजित डोवाल हे १९६८ च्या आयपीएस केडरचे अधिकारी आहेत.

सैन्याकडून देण्यात येणार्‍या किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलेले ते पहिले पोलिस अधिकारी आहेत. २००५ साली इंटेलिजेंस ब्युरोच्या प्रमुख पदावरून निवृत्त झाले होते.

२०१४ सालच्या निवडणुकांदरम्यान त्यांची भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नेमणूक करण्यात आली होती. १९९९ साली कंधारमध्ये इंडियन एअरलाइनचे आयसी ८१४ विमान अपहरणकर्त्यांकडून अपहरण करण्यात आले होते.

त्यावेळी अपहरणकर्त्यांबरोबर वाटाघाटी करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. १९८४ मध्ये खलिस्तानी आतंकवादीविरोधात चालवण्यात आलेल्या ऑपरेशन ब्ल्यु स्टारमध्ये देखील त्यांनी महत्वाची भूमिका निभावली, यात ते सीक्रेट एजेंट बनून रिक्षावाल्याच्या पेहराव करून सुवर्ण मंदिरात गेले होते.

उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकचे नियोजन आणि धोरण ठरवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये तब्बल ३३ वर्ष अधिकारी पदावर जम्मू कश्मीर, पंजाब येथे काम केले आहे. २०१४ पासून ते प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहत आहेत