Maharashtra News : महाराष्ट्रासह संबंध देशभरात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने सध्या उपलब्ध असलेले वाहतूकीचे पर्याय आणि मार्ग अपुरे पडत आहेत. राज्यातील विविध महामार्गावर वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे आणि वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे. दरम्यान कन्नड ते चाळीसगाव दरम्यान औट्रमघाट अर्थातच कन्नड घाटात देखील नागरिकांना कायमच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे यामुळे कन्नड घाटात अनेकदा अपघातही घडत आहेत. दरम्यान या घाटबाबत एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. खरतर हा घाट खूपच घुमावदार आहे. अशा परिस्थितीत घाट सेक्शनमध्ये जर वाहतूक कोंडी झाली तर प्रवाशांना मोठा फटका बसत असतो. वाहतूक कोंडीमध्ये प्रवाशांना तासांतास थांबावे लागते. मात्र आता ही वाहतूक कोंडी फुटणार आहे. कारण की, या घाटातील वाहतुकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एक अतिशय महत्त्वाचा निकाल दिला आहे.
औरंगाबाद खंडपीठाने कन्नड घाट 11 ऑगस्ट पासून काही वाहनांसाठी कायमचा बंद करण्याचा मोठा निर्णय दिला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कन्नड घाटात होणारी वाहतूक कोंडी पाहता औरंगाबाद खंडपीठांमध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या जनहित याचिकेवर काल अर्थात 4 ऑगस्ट 2023 रोजी सुनावणी पार पडली. या सुनावणीत माननीय न्यायालयाने काही अपवाद वगळता कन्नड घाट 11 ऑगस्टपासून जड वाहतुकीसाठी बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय जी खोब्रागडे यांच्या दोन सदस्य बेंचने हा निर्णय दिला आहे. विशेष म्हणजे माननीय न्यायालयाने जड वाहतुकीसाठी इतर पर्यायी मार्ग देखील सुचवला आहे. औरंगाबाद खंडपीठाने जड वाहतूक कन्नड घाट मार्गे बंद करण्याचा निकाल दिला असून ही जड वाहतूक औरंगाबाद- दौलताबाद टी पॉईंट- देवगाव रंगारी – शिऊर बंगला-वाकळा-पिंपरखेड-न्यायडोंगरी मार्गे चाळीसगाव अशी चालवली पाहिजे, असे देखील यावेळी सुचवले आहे. एकंदरीत न्यायालयाच्या या निर्णयामुळे कन्नड घाटात आता ट्रक, ट्रेलर, पेट्रोल डिझेलची वाहतूक करणारे टँकर, दूध टँकर यांसारख्या जड वाहणांना कायमची बंदी राहणार आहे.