ताज्या बातम्या

मोठी बातमी ! नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :-  केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिशा सालियनच्या कुटुंबीयांनी राणे पिता-पुत्राविरोधा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

त्यांच्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमके काय आहे कारण? जाणून घ्या दिशा सालियनवर बलत्कार करून तिची हत्या झाली आहे.

ती गरोदरही होती, असा दावा नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत आक्षेप घेतला होता.

राणेंमुळे आपल्या मुलीची बदनामी होत आहे, त्यांनी तिची बदनामी करणं थांबवावं, असं आवाहन सालियन कुटुंबीयांनी केलं होतं.

त्यानंतर आता सालियन कुटुंबीयांनी पोलिसांत राणे पिता-पुत्राविरोधात फिर्याद दिली होती. दरम्यान आज त्यांनी राणे पिता-पुत्रांविरोधात तक्रार दाखल केली असून मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान दिशाबद्दल समाजमाध्यमावर नमूद असलेली चुकीची व बदनामीकारक माहिती काढून टाकण्यात यावी अशी तक्रार आई वसंती सॅलियन व वडील सतीश सॅलियन यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे केली आहे.

त्यामुळे दिशाच्या मृत्यूबाबत कोणतेही पुरावे नसताना नारायण राणे यांनी तिच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी दिशाच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Ahmednagarlive24 Office