मोठी बातमी : राज्यात कधीही निवडणुका !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- राज्य सरकारमधल्या तिन्ही पक्षांमध्ये विसंवाद असल्याची टीका केली जात असतानाच भाजपाकडून एक मोठं विधान करण्यात आलं आहे.

भाजपा आमदार आशिष शेलार आज पुण्याच्या मावळ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये भाजपाच्या पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत असताना त्यांनी हे विधान केल्यामुळे पुन्हा एकदा राज्यात निवडणुकांची चर्चा सुरू झाी आहे.

आशिष शेलार यांच्या या विधानामुळे राज्याच तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनाच अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.

“जो मैं बोलता हूं वही करता हूं, और जो मैं नहीं बोलता, वो डेफिनेटली करता हूं. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका, पालकमंत्र्यांनी आणि आमदारांनी हे लक्षात ठेवावं”, असं आशिष शेलार यावेळी म्हणाले.

“काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं वर्णन घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज असं होईल”, असं देखील आशिष शेलार म्हणाले. यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी राज्यातील तिन्ही सत्ताधारी पक्षांवर टीका केली आहे.

“ज्या पद्धतीने तीन पक्षांत आपापसात विसंवादाची रोज लढाई लागली आहे आणि त्या तीन पक्षातल्या दोन पक्षांचे जे संकेत आमच्याकडे येत आहेत, या सगळ्याचा अभ्यास केला तर अनुमान असं काढता येऊ शकतं की राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकेल”, असं ते म्हणाले.

Ahmednagarlive24 Office