Maharashtra : मोठी बातमी ! अखेर विनायक मेटेंच्या कारचालकाला अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra : शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांचा काही दिवसांपूर्वी रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या पघाताची चौकशी सुरु आहे. काल त्यांचा कारचालक एकनाथ कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आज त्याला अखेर अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य गुन्हे विभागाने (सीआयडी) रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलिस ठाण्यात चालक एकनाथ कदम याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. सीआयडी या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटे हे 14 ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यातून मुंबईकडे कारने येत होते. पहाटे 5.30 वाजता मुंबई-पुणे महामार्गावरील भाताण बोगद्याजवळ मेटे यांची कार अचानक ट्रकवर आदळली.

अपघात एवढा भीषण होता की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. अपघातात जखमी झालेल्या मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताचा तपास सीआयडीकडे सोपवला होता. याप्रकरणी सीआयडीने ट्रकचालकाला अटक केली आहे. तपासाअंती सीआयडीने काल रसायनी पोलिस ठाण्यात मेटे यांच्या चालकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीआयडीने फिर्यादीत म्हटले आहे की, चालक भरधाव वेगाने कार चालवत होता आणि त्याच्याच चुकीने कार ट्रकला धडकली. आज पोलिसांनी एकनाथ कदमला अटक केली आहे.