अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :- एसटी कामगारांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीचा अभ्यास करून शासन सकारात्मक निर्णय घेईल.
तसेच विलिनीकरणासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीला आपला अहवाल लवकर देण्याबाबत सांगण्यात येईल, असे आश्वासन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिले आहे.
तसेच एसटी कर्मचार्यांनी संप मागे घेतला तरच निलंबनाची कारवाई मागे घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कामगार संपावर गेले आहेत.
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संपाची कोंडी फुटावी म्हणून सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने आज परब यांची भेट घेऊन चर्चा केली.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना परब यांनी कर्मचार्यांचे नुकसान होऊ नये अशी भावना व्यक्त करत कामगारांना संप मागे घेण्याचे आवाहन केले.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारने समिती गठीत केली आहे.
या समितीने विलिनीकरणाबाबत सकारात्मक अहवाल दिल्यास राज्य सरकार तो मंजूर करेल, अशी ग्वाहीही परब यांनी दिली. तसेच विलिनीकरणसंदर्भात नेमलेल्या समितीला आपला अहवाल लवकर देण्याबाबत सांगण्यात येईल,
असेही त्यांनी सांगितले. दरम्यान कामगार संघटनांच्या मागण्यांनुसार एसटीच्या कर्मचार्यांना सरकारी कर्मचार्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता वाढवून दिला आहे