विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी… ‘या’ विद्यापीठाने शुल्कमाफीच घेतला निर्णय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- कोरोनामुळे पालकांची आर्थिक स्थिती आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन राज्य शासन आणि व्यवस्थापन परिषदेत घेतलेल्या निर्णयानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शुल्कमाफी आणि भरणा करण्यात सवलत दिली आहे.

तसेच कोरोनाकाळात आई, वडील किंवा पालक गमावलेल्या पाल्यांना संपूर्ण शुल्क माफ करण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक मंगळवारी शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव यांनी काढले आहे.

दरम्यान यापूर्वीही पुणे विद्यापीठाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. आता त्या पाठोपाठ मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान विद्यापीठाने याबाबत परिपत्रक जारी केले असून यामध्ये म्हंटले आहे कि, विद्यापीठाने घेतलेला हा निर्णय विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विभाग, उपपरिसर आणि संलग्नित महाविद्यालयांना लागू आहे.

ज्या विद्यार्थ्यांच्या आई, वडील किंवा पालकांचे कोविडच्या प्रादुर्भावाने निधन झाले आहे. त्यांचा पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण शुल्क माफ करण्यात येणार आहे.

अनुदानित महाविद्यालये आणि विद्यापीठातील विभागामध्ये आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कामधील जिमखाना, विविध गुणदर्शन, उपक्रम, कॉलेज मॅगझीन, संगणक, क्रीडानिधी, वैद्यकीय निधी आणि यूथ फेस्टिव्हल यावरील शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24