ताज्या बातम्या

मनसेच्या गोटातून मोठी बातमी ! मनसे पुणे शहरप्रमुख पदावरुन वसंत मोरेंना हटवले, राज ठाकरेंचा मोठा निर्णय

Published by
Ahmednagarlive24 Office

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना मशिदीवरील भोंग्याविषयी (Mosque Loudspeaker) वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसेतील कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यामध्ये नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले आहे.

मनसेचे पुण्याचे (Pune) नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) हे सुद्धा नाराज झाले आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः वसंत मोरे यांना बोलावणं पाठवले होते.

राज ठाकरे वसंत मोरे यांची मनधरणी किंवा नाराजी दूर करण्यात यशस्वी होणार का? तसेच राज ठाकरे याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.

मात्र वसंत मोरे यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन (MNS Pune city chief post) हटवण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याची आहे. पक्षातर्फे राज ठाकरे यांची सही असल्याचा आदेश जरी करण्यात आला आहे.

मनसेचे पुण्यातील दुसरे नगरसेवक साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्याकडे मनसे पुणे शहर प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

वसंत मोरे यांनी अगोदरच पुण्यातील उपविभाग प्रमुख आणि उपशहर प्रमुखांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडला आहे. पक्षसंघटनासाठी बनवलेल्या ग्रुपवर कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाले होते.

अखेर चर्चा टाळण्यासाठी वसंत मोरेंनी ग्रुप सोडणं पसंत केलं होतं. एका उपविभाग प्रमुखाच्या पोस्टवरुन ग्रुपमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर मोरेंनी ग्रुप सोडला आणि सिंहासनावर बसलेला फोटो व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला शेअर केला होता.

वसंत मोरे यांना अडचण काय?

वसंत मोरे यांच्या मतदार संघात मुस्लिम मतांची संख्या जास्त आहे. कात्रज प्रभागात मुस्लिमांची 3 हजार 800 मतं आहेत त्यामुळे राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे वसंत मोरे याना अडचण निर्माण झाली आहे.

Ahmednagarlive24 Office