मोठी बातमी ! महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत आरोग्य मंत्र्यांनी केले मोठे विधान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कडक लॉकडाऊन करण्यावर येत्या दोन दिवसात निर्णय होणार आहे.

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत राहिली तर काही शहरात लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा लागेल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. उद्या याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल.

काही दिवस दिले जातील. लगेच उद्या लॉडकडाऊन जाहीर होणार नाही, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन टाळायचं असेल तर जनतेनं नियम पाळायला हवे, असं आवाहनही टोपे यांनी नागरिकांना केलं आहे.

मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक तसेच नागपूर या मुख्य शहरांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस हजारोंनी वाढत असल्याचं चित्र समोर आलं आहे.

प्रशासनातर्फे काही ठिकाणी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही कोरोना आटोक्यात येत नसल्याने आता कडक लॉकडाऊन करण्यात येऊ शकतं, असे स्पष्ट संकेत स्वतः आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24