मोठी बातमी ! दहावी – बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा येत्या एप्रिल अखेर पासून सुरू होणार आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात विद्यार्थी तसेच पालकांमध्ये काहीशी संभ्रमावस्था होती.

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. राज्यात इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे.

तर इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिल व २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे. अशातच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ मिळेल,

अशी घोषणा राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. परीक्षेसाठी ३० मिनिटे अतिरिक्त दिले जातील दरवर्षी ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी ३ तास वेळ दिला जात असे.

परंतु, यावर्षी विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर ४० व ५० गुणांच्या परिक्षेसाठी १५ मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे.

परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळी तासासाठी २० मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येईल.

परीक्षेच्या काळात एखाद्या विद्यार्थ्यांस कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन, कन्टेनमेंट झोन,

संचारबंदी अभावी परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यात विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. परीक्षा मंडळामार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै- ऑगस्ट मध्ये घेतली जाणार आहे.

या परीक्षांची परीक्षाकेंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येणार आहे. सुरक्षात्मक उपाय योजना परीक्षेसंदर्भात शाळा, कनिष्ठ महाविद्यालय,

केंद्र प्रमुख पर्यवेक्षक व अन्य बाबी साठी स्वतंत्र सूचना देण्यात येणार आहे. कोरोनाच्या संदर्भातील केंद्रशासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे दिल्या जाणार आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24