ताज्या बातम्या

Maharashtra : मोठी बातमी ! शिंदे गटातील खासदारांची केंद्रात वर्णी? केंद्रात किती मिळणार मंत्रिपद?

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra : राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील खासदारांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच केंद्रामध्ये २ मंत्रिपद मिळावी अशी मागणी देखील करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात शिंदे-भाजप सरकार आल्यापासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपने महाविकास आघाडीमधील शिवसेनेमधील काही आमदार फोडून सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर शिंदे गटातील मुख्यमंत्री देखील करण्यात आला.

आता केंद्रामध्येही मंत्रिपद मिळावे अशी मागणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्येकडे केली आहे. तसेच अमित शाह यावर आजच निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले खासदार गजानन कीर्तिकर यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच दोन राज्यपाल देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि गजानन कीर्तिकर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात जागा मिळण्याची शक्यता असल्याचेही सांगितले जात आहे. या दोन्ही खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात जागा मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वर्षा निवासस्थानी सोमवारी रात्री उशिरा बैठक पार पडली होती. आता बैठकीमध्ये काय चर्चा झाली त्याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीबाबत अमित शाह काय निर्णय घेणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तसेच गजानन कीर्तिकर केंद्रात मंत्रिपद मिळावं या आशेने तर शिंदे गटात गेले नाहीत ना? असा प्रश्न आता डोकं वर काढू लागला आहे.

Ahmednagarlive24 Office