Maharashtra : मोठी बातमी ! “महाराष्ट्रही योग्यवेळी समान नागरी कायदा लागू करण्याबाबत विचार करेल”- देवेंद्र फडणवीस

Maharashtra : देशातील केंद्र सरकार अनेकवेळा समान नागरी कायदा लागू करण्याबाबत विधेयक मांडत असते. तसेच देशातील काही राज्यांमध्ये हा कायदा लागू देखील करण्यात आला आहे. मात्र आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याबाबत मोठे विधान केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याबाबत त्यांचे मत मांडले आहे. तसेच योग्य वेळी विचार करू असेदेखील त्यांनी म्हंटले आहे. त्यामुळे राज्यात लवकरच हा कायदा लागू होणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले, संविधानाने प्रत्येक राज्यात समान नागरी कायद्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे हळूहळू सगळेच कायदा लागू करतील असे मला वाटते, असे फडणवीस म्हणाले आहेत.

पुढे बोलताना फडणवीस यांनी कोणत्या राज्यात हा कायदा सध्या लागू आहे याबाबत भाष्य केले आहे. समान नागरी कायदा गोव्यात आहे, आता उत्तराखंड लागू करत आहे.

हिमाचल प्रदेश, गुजरात हे राज्यही समान नागरी कायदा लागू करणार आहेत. हळूहळू सर्व राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करतील. शिवाय त्यांना करावाच लागेल”, असेही देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत.

महाराष्ट्रही योग्यवेळी हा कायदा लागू करण्याबाबत विचार करेल. संविधानाने याबाबत आपल्यावर जबाबतदारी टाकलीय की आपण राज्यात समान नागरी कायदा आणावा, असे सूचक विधान फडणवीसांनी केल्याने चर्चांना उधाण आले आहे.