अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ( दि.30) राज्याला संबोधित केले आहे. ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे.
यामध्ये अनेक महत्वपूर्ण माहिती दिली आहे. यातच सर्वाना उत्सुकता असलेली म्हणजेच लसीकरणावर ठाकरे यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे.
राज्यामध्ये 18 ते 44 वयोगटातील लसीकरण उद्यापासून म्हणजेच 01 मेपासून सुरु करतअसल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यांनी ही माहिती आज ( दि. 30) राज्याला संबंधित करताना दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या संवादामधील 10 महत्वाचे मुद्दे
1. उच्च न्यायालयाने आत्ता असलेल्या निर्बंधांपेक्षा कडक निर्बंध लादण्याची गरज आहेका असं विचारलंय. तशी गरज वाटत असली तरी मला ही गरज वाटत नाही. हे निर्बंध लादले जाणार नाही. माझे महाष्ट्रातील नागरिक नियम पाळतील.
2. गरज नसताना रेमडेसिव्हीर दिल्यास त्याचे दुष्परिणाम होतात. अनावश्यक रेमडेसिव्हीरचा वापर करू नये. रेमडेसिव्हीरच्या चुकीच्या वापराने दुष्परिणाम होत आहेत. महाराष्ट्राला दररोज 50 हजार इंजेक्शनची आवश्यकता आहे. केंद्र आता रोज 35 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन देत आहेत.
3. ऑक्सिजनला रुग्णाजवळ नेता येत नसेल तर रुग्णाला ऑक्सिजन प्लांटजवळ नेण्यात येतंय. रुग्णालयांना ऑक्सिजन प्लँट उभारण्यास सांगण्यात आलंय. भविष्यात ऑक्सिजनची कमतरता पडणार नाही, अशी व्यवस्था उभी केली जातेय.
4. तिसरी लाट येणार असं तज्ज्ञ सांगतायत. तिसऱ्या लाटेचे घातक परिणाम महाराष्ट्रावर होऊ देणार नाही. त्यासाठी सरकारनं कंबर कसलीय. उद्योजकांना तिसऱ्या लाटेची तयारी करायला सांगितलं आहे.
5. महाराष्ट्रात जवळपास 6 कोटी नागरिक आहेत. प्रत्येकाला दोन डोस द्यायचे ठरले तर 12 कोटी डोसेस लागणार आहे. लस मिळत असेल तर एकाचवेळी सर्व पैसे देऊन आपण लस खरेदी करु.
6. केंद्र म्हणून सरकारने राज्यांना वेगळं अॅप द्यावं किंवा राज्यांना तशी परवानगी द्यावी. हे अॅप केंद्राच्या अॅपशी जोडलं जाईल. ही व्यवस्था होत नाही तोपर्यंत अॅपवर लसीकरणाची नोंद करताना काळजी घ्या.
7. जून जुलैपासून लस पुरेशा प्रमाणात मिळेल. तोपर्यंत लसीकरणासाठी झुंबड उडू देऊ नये. लसीकरण केंद्रांवर गर्दी करुन चालणार नाही.
8. महाराष्ट्रात मार्च 2020 रोजी 2 कोरोना चाचणी प्रयोगशाळा होत्या. 29 एप्रिल 2021 रोजी 609 प्रयोगशाळा आहेत. जून 2020 रोजी कोव्हिड सेंटर्सची संख्या 2665 होती, ती आता 29 एप्रिल 2021 रोजी 5595 इतकी आहे. जून 2020 रोजी 3 लाख 36 हजार 384 रुग्णशय्या (बेड), 29 एप्रिल 2021रोजी 4 लाख 31 हजार 902 बेड उपलब्ध झालेत.
9. आपल्याकडे 3 लाख 44 हजार लसी आल्या आहेत. त्या लोकसंख्येनुसार वितरित झाल्या आहेत. आपली क्षमता दहा लाखांची दिवसा आहे.
आपण पाच लाखांचा टप्पा गाठला आहे. 10. आगामी काळात लग्नाचे अनेक मुहुर्त आहेत. मात्र, कोरोनामुळे आपण केवळ 25 माणसांची परवानगी दिलीय.