Maharashtra news: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. कारण तिसरा उमेदवार जाहीर करण्याची पवित्रा घेतलेल्या भाजपने केवळ दोनच उमेदवार जाहीर केले आहेत.
इतर पक्षांनी आपल्या कोट्यानुसार उमेदवार जाहीर केल्याने आता ही निवडणूक बिनविरोध झाल्याच जमा आहे. या निवडणुकीत सहाव्या जागेवरून गोंधळ उडाला होता. तेथे कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना डावलून शिवसेनेने कोल्हापूरचेच संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली.
त्यामुळे भाजपनेही या जागेवर उमेदवार देण्याची तयारी सुरू केली होती. त्यामुळे या जागेसाठी निवडणूक होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. अखेर भाजपची उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे.
त्यानुसार केंदीय मंत्री पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेचे दोन उमेदवार, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार असे सहा जागांसाठी सहाच उमेदवार रिंगणात उतरविण्यात आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याच जमा आहे.