मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यात ह्या ठिकाणी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :-  पारनेर तालुक्यातील चिंचोडी घाट येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

या प्रकरणासंदर्भात पारनेर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. पारनेर तालुक्यातील चिचोंडी घाट येथे काल एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आलेला होता.

त्याच्या अंगावर फक्त बनियान होता. छिन्नविच्छिन्न अवस्थेमध्ये मृतदेह पडलेला होता. त्या संदर्भामध्ये पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेहाची अवस्था अतिशय बिकट झालेली होती. त्यामुळे संबंधित मृतदेहाचा पंचनामा व पोस्टमार्टेम जागेवरच करण्यात आले.

या संदर्भामध्ये पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. दरम्यान या संदर्भात पोलिस निरीक्षक बळप यांनी काल मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याचा अहवाल आज किंवा उद्या प्राप्त होणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24