ताज्या बातम्या

मोठी बातमी ! रशियाकडून युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच एक मोठी माहिती समोर आली आहे, ज्यामुळे जागतिक शांतता भंग होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली असून युद्धाचे ढग अजूनच गडद झाले आहेत. दरम्यान युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतीन म्हणाले आहेत.

पुतीन यांनी रशिया विशेष लष्करी ऑपरेशनला सुरुवात करत असल्याचं सांगण्यात आलं. रशियाने सैन्य युक्रेनच्या डॉनबॉस प्रांतात घुसवले आहे.

या ठिकाणी रशियन सैन्यातर्फे स्पेशल ऑपरेशनला सुरुवात झाली असून युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या लष्करी कारवाईमधून युक्रेनचे असैनिकीकरण करण्याचा प्रयत्न असेल असंही ते म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी युक्रेनच्या लष्कराला शस्त्र खाली ठेवा आणि आपल्या घऱी निघून जा असंही सांगितलं आहे. रशियाच्या युक्रेन ऑपरेशनमध्ये हस्तक्षेप करणार्‍यांच्या विरोधात सूड उगवणार असल्याच जाहीर वक्तव्य केलं आहे.

तसेच या कारवाईत कोणीही हस्तक्षेप केल्यास त्याला प्रत्युत्तर देण्याचं वचन दिलं आहे. राजधानी कीव मध्ये बॉम्ब हल्ल्यांना सुरुवात झाली आहे. तर व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या सैन्याला शस्त्र खाली ठेवायला सांगितलं आहे.

रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा केलीय. यामुळे युद्धाचा भडका उढण्याची शक्यता आहे. रशियाने अशी घोषणा केली असताना अमेरिका, युरोपसह इतर देश युक्रेनच्या पाठिशी आहेत. रशियाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आता जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office