ताज्या बातम्या

मोठी बातमी : अट्टल गुन्हेगार श्रीगोंदे पोलिसांच्या जाळ्यात !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Ahmednagar Crime :- अहमदनगर, पुणे, सोलापूर, बीड, बारामती जिल्ह्यात जबरी चोरी, मोटारसायकल चोरी करणारा अट्टल गुन्हेगार श्रीगोंदे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

श्रीगोंदे पोलिसांनी सुमारे ३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. २८ फेब्रुवारी रोजी सुमण वामन रायकर, रा. हंगेवाडी यांनी फिर्याद दिली होती.

यात २६ फेब्रुवारी रोजी २०२२ रोजी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरी जाण्यासाठी गाडीची वाट पाहत असताना यातील आरोपीने मला ओळखता,

मी तुम्हाला तुमचे घरी सोडतो असे म्हणून फिर्यादीस मोटार सायकलवर बळजबरीने बसवून निमगाव खलु गावच्या शिवारात नेवून मारहाण करून सोन्या, चांदीचे दागिने,

रोख रक्कम व मोबाईल असा ४२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. त्याबाबत श्रीगोंदे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना पोलिस निरीक्षक रामराव ढिकले

यांना मिळालेल्या माहितीवरून यातील सराईत गुन्हेगार प्रकाश अजिनाथ गायकवाड, वय ४६ वर्षे रा. बेनवडी, ता. कर्जत याने केल्याची माहिती मिळाली. त्यावरुन यातील आरोपीस बेनवडी येथून ताब्यत घेतले.

चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. चोरलेल्या मालापैकी आठ ग्रॅमचे सोन्याचे ३० हजारांचे दागिने काढून दिले. त्याच्याकडील मोटार सायकलची चौकशी केली असता सदर मोटार सायकल ही शिवाजीनगर पोलिस स्टेशन, बीड येथून चोरुन आणल्याचे त्याने सांगितले.

चौकशीत त्याच्याकडून पाच मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपीकडून जबरी चोरीचा १ गुन्हा व मोटार सायकल चोरीचे ५ गुन्हे उघडकीस आणून ३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुदेमाल हस्तगत करण्यात आला आहे. श्रीगोंदे पोलिसांनी अट्टल गुन्हेगाराला मुद्देमालासह अटक केली

Ahmednagarlive24 Office