अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-खाता का नेता, अक्का आठ नेता का?, पैसे की फिक्र नको खाते में लिख देता, असे म्हणणारे एक वडापाववाले चाचा अहमदनगर मधील संगमनेर तालुक्यात आपले लोकप्रिय वडापाव सेंटर चालवतात.
आपल्या हटके बोलण्याच्या शैलीने ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या या चाचांचे नाव मोहम्मद अन्सार आहे. ते आता सगळीकडेच वडापाव चाचा नावाने प्रसिद्ध झाले आहे.
महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील समनापुरमध्ये राहणाऱ्या या चाचांनी नसीब वडापाव सेंटरला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. चाचांच्या या दुकानावर वडापावचे शौकीन नेहमीच गर्दी करुन असतात.
हे चाचा त्यांच्या सेल्समनशिप करताना त्यांच्या हटके बोलण्यावरुन ओळखले जातात. ते ग्राहकांना इतके आकर्षित करतात कि एकदा त्यांच्याकडे आलेला ग्राहक पुन्हा त्यांच्याकडे वळून त्यांच्याकडेच येतात.
मात्र त्यांच्या चहात्यांसाठी एक वाईट बातमी आहे कारण आज संगमनेरजवळील समनापूर येथे सोमवारी सायंकाळी प्रसिद्ध नशिब वडापाव सेंटर येथे वडापाव खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याचे आढळून आले.
संबंधीत वडापाव सेंटर चालकाने करोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेचे नियम न पाळल्याने सदर वडापाव सेंटर सात दिवसांसाठी प्रशासनाने सील केले आहे. सदर वडापाव सेंटरवर वडापाव खरेदी करणार्यांनी सामाजिक अंतर न ठेवता,
मास्क व सॅनिटायझरचा वापर न केला नसल्याचे आढळले. अंदाजे 50 पेक्षा जास्त व्यक्तींना जमा करुन घोळक्याने वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्या पथकाने जावून सदर वडापाव सेंटरचा पंचनामा केला. सदर अस्थापनेने करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने नशिब वडापाव सेंटर मौजे समनापूर हे दुकान 5 मार्चपासून पुढील सात दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे.