मोठी बातमी ! इंदोरीकर महाराजांविरोधातील खटला संगमनेर कोर्टानं रद्द केला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-लिंग भेदभाव करणारे वक्तव्य केल्यावरून वादात सापडलेले प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.

लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.

आता इंदोरीकर महाराजांना कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने इंदोरीकर महाराज यांचे अपील मंजूर केले आहे. दिवाणी न्यायालयाने दिलेल्या प्रोसेस इश्यू विरोधात त्यांनी अपील केले होते.

न्यायालयाने इंदोरीकर महाराजांच्या बाजूने निकाल देत खटला रद्द करण्यात आला आहे. संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयानं इंदुरीकर महाराज यांच्या बाजूनं निकाल दिल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पेढे वाटून जल्लोष केला.

नेमके काय आहे प्रकरण? :- “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते” असं वादग्रस्त वक्तव्य महाराज इंदोरीकर यांनी केले होते.

लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं.

यावर दिलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवशी इंदोरीकरांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा केला होता. इंदोरीकर महाराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24