अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आपला गड राखत भाजपला धूळ चारली आहे. पण, नंदीग्राम मतदारसंघातून ममतादीदींना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सुरुवातीला ममतादीदी जिंकल्या असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण, भाजपचे उमेदवार सुवेंद्र अधिकारी विजयी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.पण सुवेंद्र अधिकारी अंतिम निकालाअंती चित्रच पालटले.
सुवेंद्र अधिकारी हे 1622 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने तृणमूल काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना गळाला लावले.
त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्त्वाची लढाई झाली होती. हे आव्हान स्विकारत ममता बॅनर्जी भाजपसमोर ठामपणे उभ्या राहिल्या होत्या.
आतापर्यंतच्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असे दिसत आहे. तर ‘अब की बार 200 पार’च्या वल्गना करणारा भाजप 100 जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे.