मोठी बातमी ! राजधानी दिल्ली व जम्मू काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-   आज सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास पाकिस्ताच्या उत्तर-पश्चिम भागामध्ये तब्बल ५.६ रिश्टर स्केलचा भकंप झाल्याची माहिती समोर आली आहे.

या भूकंपाची तीव्रता इतकी होती की दिल्लीसह पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील या भूकंपाचे धक्के जाणवले.

दिल्ली ते जम्मू-काश्मीरपर्यंत आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. समोर आलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात होता.

सकाळी ९.४५ वाजता ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप अफगाणिस्तान – ताजिकिस्तान सीमा प्रदेशात झाला.

या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील काबूलपासून २५९ किलोमीटर उत्तर-पूर्व,

ताजिकिस्तानमधील दशानबेपासून ३१७ किलोमीटर दक्षिणपूर्व आणि पाकिस्तानमधील इस्लामाबादपासून ३४६ किलोमीटर उत्तर – पश्चिम असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सेस्मोलॉजिनं दिली आहे.