मोठी बातमी ! राज्यात 5 टप्प्यांमध्ये होणार अनलॉक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना परिस्थिती लक्षात घेता अनलॉकसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

यामध्ये 5 टप्प्यांनुसार राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

  • पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांत सर्व सेवा, सुविधा सुरू होणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात असलेल्या जिल्ह्यांत काही निर्बंध लागू असणार आहेत. उद्यापासून या नियमांची अंमलबजावणी होणार आहे.
  • पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे – सर्व 18 जिल्हे
  • अनलॉकचा निर्णय दुसर्‍या टप्प्यात 5 जिल्हे
  • तिसऱ्या टप्प्यात 10
  • जिल्हे चौथ्या टप्प्यात 2 जिल्ह्यांचा समावेश

पूर्ण अनलॉक लागू होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, सायकलिंक ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, खासगी कार्यालये, सरकारी कार्यालयांना 100 टक्के मुभा, क्रीडांगणे आणि थिएटर्सला परवानगी असेल. शूटिंगला देखील परवानगी असेल. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी असेल. लग्नसोहळ्यांना देखील 100 टक्के उपस्थितीची परवानगी असेल, असे वडेट्टीवार म्हणाले.

आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यांची वर्गवारी 5 टप्प्यांमध्ये करण्यात आली असून यापुढे ज्याप्रमाणे जिल्ह्यांमधील कोरोना आकडेवारी बदलेल, त्यानुसार जिल्ह्यांची वर्गवारी देखील एक ते पाच अशा टप्प्यांमध्ये बदलेले, असे देखील विजय वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.

अनलॉक झालेले राज्यातील 18 जिल्हे :- भंडारा,बुलढाणा,चंदपूर,धुळे, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, जालना. लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24