मोठी बातमी : भंडारदरातून पाणी सोडले, खबरदारीचा उपाय म्हणून…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :-नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात आषाढ सरी जोरदार कोसळत असल्याने भंडारदरा धरण काल दुपारी 1 वाजता 80 टक्के भरले.

जलाशय परिचलन सुचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या अंब्रेला फॉलद्वारे 413 क्युसेकने पाणी प्रवरा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे आता निळवंडे , भंडारदराने पाणी सोडण्यात येत आहे. भंडारदरा व वाकी परिसरात पाऊस सुरू असल्याने वाकी तलावातून 1574 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

अन्य ठिकाणचे पाणीही जमा होत असल्याने 8320 दलघफू क्षमतेचे निळवंडे धरण 40 टक्कयांवर गेला आहे. या धरणातील पाणीसाठा काल सकाळी 3215 दलघफू झाला होता.परिसरातही पावसाचा जोर कायम आहे. काल दिवसभर झालेल्या पावसाची नोंद 47 मिमी झाली आहे.

काल सकाळी नोंदला गेलेला पाऊस असा-भंडारदरा 163, घाटघर180, रतनवाडी 170, वाकी159 मिमी भंडारदरा धरण पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने जलाशय परिचलन सुचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी 29 जुलै 2021 रोजी भंडारदरा धरणाच्या 200 व्हॅाल्व मधून 413 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आलेला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24