अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- राज्यातील महसूल विभागाला गतिमान करण्यासाठी ऑनलाईन सात-बारा ही संकल्पना राबवून संगणकीकृत केले.
या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यात केवळ 24 तासात 72 हजार सातशे नागरिकांनी सात-बारा उतारा डाउनलोड केला आहे.
राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सामान्य माणसाच्या सोयीकरता महसूल विभागात ऑनलाईन सातबारा, इ फेरफार, ई-मोजणी असे विविध उपक्रम राबवले.
याचाच एका भाग म्हणून सोमवारी राज्यात 72 हजार 700 डिजिटल स्वाक्षरी सातबारा आणि खाते उतारे डाउनलोड झाले आहे.
राज्य सरकारला 23 लाख रुपयांचा महसूल एका दिवसात प्राप्त झाला आहे. सामान्य शेतकर्यांना केव्हाही आणि कुठेही सातबारा व खाते उतारे उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या
महाभूमी संकेतस्थळावरून सोमवार ( ता. 21 जून) रोजी आत्तापर्यंतची उच्चांकी सेवा देण्यात आली. यापूर्वी एका दिवसात 62 हजार उतारे डाऊनलोड झाले होते.
हा विक्रम मोडीत काढताना राज्य सरकारच्या ऑनलाईन सातबारा या महत्व पूर्ण योजनेला चांगले यश मिळत आहे.
महसूल विभागाकडून सामान्य नागरिकांना जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या जात आहे.