मोठा धक्का : रेमडेसीवीरचा पुरवठा करण्यास कंपन्यांचा नकार!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-रेमडेसीवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनला तुटवडा सुद्धा जाणवू लागला आहे.

अशातच राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. 8.50 लाख रेमडेसीवीर खरेदी टेंडर पुढे ढकलण्यात आला आहे.

इंजेक्शनचा पुरवठा करण्यास कोणताही पुरवठादार तयार नाही.राज्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारने इंजेक्शन खरेदीसाठी प्रयत्न सुरू केले आहे.

पण पुरवठादारांनी इंजेक्शन देण्यास नकार दिला आहे. राज्य सरकारला 654 रुपये दराने रेमडेसीवीर इंजेक्शन हवे आहे.

पण खुल्या बाजारात बाराशे रुपये किंमत असताना कंपनी सरकारला रेमडेसीवीर द्यायला इच्छुक नाहीत. राज्य सरकारने ज्या दरात मागणी केली आहे,

त्या दरात द्यायला कंपन्या तयार नाहीत म्हणून 1200 रुपयांना इंजेक्शन घ्या, अशी भूमिका कंपन्यांनी घेतली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24