मनोहर भोसले बाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट ! सरकारी पोर्टलचा वापर करून सांगायचा लोकांचे भविष्य !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- भोंदूबाबा मनोहर भोसले याने भविष्य सांगण्याच्या नावाखाली लाखो लोकांच्या पावतीवर आधारकार्ड क्रमांक घेऊन खाजगी डाटा गोळा केला असल्याचा दावा क्रांतीकारी आवाज संघटनेने केला आहे.

मनोहर भोसले याची एका प्रसिद्ध मराठी मालिकेच्या निर्मात्याशी व्यावसायिक भागिदारी असल्याचे पुरावे या संघटनेच्या वतीने प्रसिद्धी माध्यमांकडे देण्यात आले आहेत.

मनोहर भोसले हा एका सरकारी पोर्टलचा गैरवापर करून लोकांची माहिती मिळवत तीच माहिती स्वतःची विद्या म्हणून लोकांना सांगत असतो, असा दावा क्रांतीकारी आवाज संघटनेचे कार्याध्यक्ष मच्छिंद्र टिंगरे यांनी केला आहे.बारामती येथे झालेल्या पत्रकार परिषदमध्ये त्यांनी आज हा गौप्यस्फोट केला आहे.

मनोहर भोसले यांचे कार्यकर्ते लोकांकडून बाहेर महाराजांना भेटण्यासाठी पावती फाडत असतात. त्यावेळी पावतीवर नागरिकांचा आधार कार्ड नंबर व पॅन कार्ड नंबर टाकून घेतला जातो आणि भक्तांना दोन तास प्रतीक्षा करायला लावली जाते.

दरम्यानच्या काळात ‘माय रेशन’ या शासकीय पोर्टलमधून संपूर्ण कुटुंबाची माहिती काढून तीच माहिती भक्ताला दिली जाते, अशी हातचलाखी करून मनोहर मामा भक्तांना उल्लू बनवत असल्याचा दावा क्रांतीकारी आवाज संघटनेने केला आहे.

याशिवाय मनोहर भोसले याचा बॉडीगार्ड राघू देवकर हा पोलीस कर्मचारी मामाच्या भेटण्याच्या फीचे रक्कम स्वतःच्या अकाउंटवर घेत होता. त्याचे पुरावे या पत्रकार परिषदेत दाखवण्यात आले. त्यामुळेच पाठीमागेच संशयाच्या भोवऱ्यात असलेला राघू देवकर हा आता आरोपी होण्याची चिन्ह दिसत आहेत.

याशिवाय मनोहर भोसले ने बारामती तालुक्यातील सावंतवाडी गोजूबावी व करमाळा (जि.सोलापूर) उंदरगाव येथे बांधलेले दोन्ही मठ हे बेकायदेशीर आहेत. या दोन्ही मठाना कोणतेही परवानगी नाही किंवा या दोन्ही मठाची नोंद ग्रामपंचायत दप्तरी नाही. त्यामुळेच या मठाची घरपट्टी, पाणी पट्टी असा मिळकत कर ही बुडवाला आहे.

या दोन्ही ग्रामपंचायतीची पत्र क्रांतीकारी आवाज संघटनेचे कार्याध्यक्ष मच्छिंद्र टिंगरे यांनी पत्रकार परिषदमध्ये सादर केली आहेत. सोलापूर येथे दाखल झालेल्या बलात्कार प्रकरणातील महिलेचे भविष्य सांगताना मनोहर भोसले याने त्या महिलेला तुझे अनेकांशी अनैतिक संबंध असल्याचे चिठीत लिहून दिले होते.

यात बारामती शहरातील एका राजकीय नेत्याचे नावं टाकल्याने मनोहर मामाने बारामती मध्ये स्वतःच्या अडचणी वाढवून ठेवल्या आहेत. दुसरीकडे क्रांतीकारी आवाज संघटनेने पहिल्यापासून दावा केला होता की. बाळुमामाच्या नावानं चांगभलं, रात्रीस खेळ चाले, 100 डे या मालिकांना पैसा पुरविला आहे,

याचा निर्माता संतोष गजानन आयचीत हा मनोहर भोसलेचा व्यावसायिक पार्टनर आहे. बारामती येथील गुन्ह्यात जप्त केलेली गाडी ही संतोष आयचित याच्या नावावर आहे. त्यामुळेच बेकायदा मार्गाने जमवलेल्या पैशात संतोष आयचीत देखील भागीदार असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

Ahmednagarlive24 Office