file photo

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या महागाईमुळे आधीच सर्वसामान्य माणसांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. ज्यामुळे लोकं त्रस्त झाले आहेत. परंतु लवकरच सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळू शकतो.

वस्तू आणि सेवा कर (GST) वरील सिंगल नेशन दराअंतर्गत पेट्रोलियम उत्पादनांवरील करा विषयी मंत्र्यांचे पॅनल विचार करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंज्यूमर किंमत आणि सरकारी महसुलात संभाव्य मोठ्या बदलासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जाऊ शकतात.

शुक्रवारी लखनऊमध्ये होणाऱ्या 45 व्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली या पॅनलमध्ये त्यावर विचार केला जाणार आहे.

जर पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटीच्या अंतर्गत आणण्यात आलं तर देशातील सर्व राज्यांमधील इंधनाचे दर समान होतील. इतकच नाही जीएसटी परिषदेने कमी स्लॅबमध्ये पेट्रोलियम उत्पादनांना स्थान दिल्यास इंधनाच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरतील.

सध्या भारतामध्ये चार प्रकारचा जीएसटी आकारला जातो. यामध्ये सर्वात कमी पाच टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के असे चार प्रकार आहेत. सध्याची स्थिती पाहिल्यास केंद्र आणि राज्य सरकार करांच्या नावाखाली इंधनावर १०० टक्के कर वसूल करत आहे.

त्यामुळे सर्वाधिक जीएसटी लावला तरी पेट्रोलची किंमत ६० रुपये प्रति लीटरच्या खालीच राहील असा अंदाज आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकार उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारकडून व्हॅट आकारला जातो. दोन्ही करांचा बोजा एवढा जास्त आहे ३५ रुपयांचे पेट्रोल वेगवेगळ्या राज्यांमध्ये ९५ ते ११५ रुपये प्रति लीटरपर्यंत पोहचलं आहे.

जीएसटी एक जुलै २०१७ पासून लागू करण्यात आला आहे. त्यावेळेच राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलवर करांच्या रुपाने अधिक अवलंबून असल्याने जीएसटीमधून इंधनाला वगळण्यात आलं होतं.

काही महिन्यांपूर्वीच सीतारामन यांनी इंधनाच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत, ज्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे.

तथापि, या दरम्यान, मंगळवार, 14 सप्टेंबर 2021, सलग नवव्या दिवशी ही दरवाढ स्थिर आहे. असे असूनही राजधानी दिल्लीत पेट्रोल 101.19 रुपये प्रति लिटर दराने आहे. त्याचबरोबर डिझेल 88.62 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत पेट्रोल 107.26 रुपये प्रति लीटर आहे.

त्याचबरोबर डिझेल 96.19 रुपये प्रति लिटर आहे. माहितीनुसार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील समिती १७ सप्टेंबर २०२१ रोजी पेट्रोल-डीझेल जीएसटीअंतर्गत आणण्याच्या प्रस्तावावर चर्चा करणार आहे.

सध्याची कर रचना आणि जीएसटी कर रचना लक्षात घेतल्यास सर्वाधिक जीएसटी लावून इंधन जीसएसटीअंतर्गत आणण्यात आलं तरी पेट्रोलचे दर जवळजवळ अर्ध्याने कमी होतील.