Amazon offer : आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर! नवीन स्मार्टफोन खरेदीवर होत आहे 20 हजार रुपयांपर्यंतचा फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Amazon offer : सध्या Amazon वर सेल सुरु आहे. या सेलदरम्यान तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करू शकता. दिग्ग्ज टेक कंपनी रेडमीच्या Redmi K50i या स्मार्टफोनची किंमत 32,999 रुपये आहे. परंतु, या सेलदरम्यान तुम्ही तो फक्त 21,999 रुपयांना खरेदी करू शकता.

इतकेच नाही तर तुम्हाला या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येत आहे. यावर तुम्ही 20,050 रुपयांपर्यंतचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे स्वस्तात शानदार फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याची तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. अशी संधी हातातून गमावू नका.

कंपनी या फोनवर 2,000 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट देत ​​असली तरी आता तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत आणखी 20,050 रुपयांनी कमी करू शकता. इतकेच नाही तर जे वापरकर्ते फोन खरेदी करतात त्यांना 6 महिन्यांसाठी Spotify Premium चे मोफत सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या फोनमध्ये, कंपनी 144Hz च्या रीफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देत असून जो 270Hz च्या टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. तुम्हाला या डिस्प्लेमध्ये 650 nits चा पीक ब्राइटनेस मिळेल. तसेच ही कंपनी डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देत आहे. स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचा हा फोन 8 GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256 GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजने सुसज्ज असणार आहे.

तसेच प्रोसेसर म्हणून फोनमध्ये MediaTek Dimensity 8100 चिपसेट देण्यात येत आहे. तर फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे दिले आहेत. यात 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल आणि 64-मेगापिक्सेल प्राइमरी लेन्ससह 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेऱ्याचा समावेश आहे.

सेल्फीसाठी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जात आहे. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचरने सुसज्ज असणाऱ्या या फोनमध्ये दिलेली बॅटरी 5080mAh आहे. ही बॅटरी 67W टर्बो चार्जिंगला सपोर्ट करते. तर कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये ब्लूटूथ 5.3, वाय-फाय 6 आणि जीपीएस शिवाय सर्व मानक पर्याय देण्यात आले आहेत.