Bike Discount Offers : बंपर ऑफर! स्वस्तात बाईक आणि स्कूटर खरेदी करणाऱ्याची संधी, ‘या’ कंपन्या देत आहेत सवलत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bike Discount Offers : बाजारात आता वेगवेगळ्या कंपन्यांच्या बाईक आणि स्कूटर लाँच होऊ लागल्या आहेत. परंतु त्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ग्राहकांना जास्त पैसे देऊन त्या खरेदी कराव्या लागत आहेत. तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका.

कारण आता तुम्हाला मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत या बाईक आणि स्कूटर खरेदी करता येतील. काही लोकप्रिय कंपन्या अशी ऑफर देत आहेत. ज्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

Yamaha ऑफर केवळ150 cc FZ मॉडेल श्रेणी आणि RayZR 125 Fi Hybrid साठी वैध असणार आहेत. या महिन्याच्या शेवटपर्यंत, तुम्हाला यामाहाच्या सवलतीच्या ऑफर आणि फायनान्स प्लॅनचा लाभ घेता येईल.

जाणून घ्या ऑफर्स

यामाहा मोटर इंडियाचे असे मत आहे की विशेष ऑफर आणि फायनान्स प्लॅन 150 FZ मोटरसायकल श्रेणी आणि 125 Fi स्कूटर श्रेणीसाठी असणार आहेत. या ऑफर अंतर्गत तुम्हाला 3,000 रुपयांचा झटपट कॅशबॅक मिळणार आहे. तसेच, फायनान्स स्कीम अंतर्गत डाऊन पेमेंट फक्त 7,999 रुपयांपासून सुरू होणार आहे. त्याशिवाय दुचाकी कर्जावर ७.९९ टक्के व्याज आकारण्यात येणार आहे.

यामाहा एफझेड मॉडेल्स

सध्याच्या कंपनीच्या मॉडेल्सबद्दल सांगायचे झाले तर कंपनी चार एफझेड मोटारसायकली विकत आहे. यात FZ-X, FZS-Fi आवृत्ती 3.0, FZS-Fi आवृत्ती 4.0 आणि FZ-Fi आवृत्ती 3.0 बाइक्सचा समावेश असेल. तर दुसरीकडे, 125 cc Fi Hybrid स्कूटर रेंजमध्ये Fascino 125 Hybrid, Ray ZR 125 Fi Hybrid तसेच Ray ZR Street Rally 125 Fi Hybrid मॉडेलचा समावेश असेल.

किती असेल किंमत?

हे लक्षात घ्या की इतर यामाहा मोटरसायकल किंवा स्कूटरवर कोणतीही सवलत मिळणार नाही. म्हणजेच तुम्हाला R15, MT15 आणि Aerox 155 च्या ऑफरपासून वंचित राहावे लागेल. या बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, FZ-S FI Ver 4.0 ची एक्स-शोरूम किंमत 1,29,400 रुपयांपासून सुरू होते आणि RayZR 125 Fi Hybrid स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 84,730 रुपयांपासून सुरू होते. त्यामुळे आता तुमच्याकडे नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी करण्याची ही उत्तम संधी असेल. गणेश चतुर्थीच्या दिवशी, तुम्ही फक्त सवलतींद्वारेच नाही तर तुम्हाला कमी डाउन पेमेंट आणि व्याजदरांद्वारे बचत करता येईल.