Bike Loan: ‘या’ सणासुदीच्या कालावधीत खरेदी करा सुपरबाईक आणि एसबीआय मार्फत घ्या लोन! वाचा पात्रता आणि अटी

Published by
Ajay Patil

Bike Loan: सध्या नवरात्र, दसरा आणि दिवाळी यासारख्या महत्त्वाच्या सणांचे दिवस तोंडावर आले असून या कालावधीमध्ये बरेच जण वाहनांची खरेदी करतात. अशा प्रकारच्या सणांच्या शुभ मुहूर्तावर अनेक जणांची वाहन खरेदी करण्याकडे कल असतो. यामध्ये चार चाकी पासून ते दुचाकी पर्यंतचे वाहने खरेदी केली जातात.

आपल्याला माहित आहे की, वाहनांच्या खरेदीवर आपल्याला बँकांच्या माध्यमातून किंवा अनेक फायनान्स कंपन्याकडून कर्ज सुविधा पुरवली जाते. अगदी याच पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडिया कडून देखील सुपर बाईकसाठी कर्ज सुविधा पुरवली जाते. जर आपण सुपर बाईकचा विचार केला तर यामध्ये अनेक उत्कृष्ट प्रकारचे वैशिष्ट्य असतात व त्यामुळे त्यांची किंमत जास्त असते. तरुणांमध्ये प्रचंड आवड असलेल्या या बाईकच्या खरेदी करता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून कर्ज देण्यात येत असून या कर्ज योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती या लेखात घेणार आहोत.

 सुपर बाईक कर्जासाठी कोण करू शकतो अर्ज?

1- या कर्जासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 21 ते 65 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

2- तसेच यासाठी स्वयरोजगार असणारे, व्यावसायिक तसेच एखाद्या फर्मचे मालक अर्ज करू शकतात.

3– याकरता करता आयटी रिटर्न फायलिंग असणे आवश्यक आहे.

4- समजा तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत नसाल व तुम्ही शेती करत असाल तर तुम्हाला आयटीआर देण्याची गरज नाही.परंतु तुमचे वार्षिक उत्पन्न चार लाख रुपये असणे गरजेचे आहे.

5- तुम्हाला सुपर बाईक अर्जासाठी सह अर्जदार म्हणून देखील अर्ज करता येऊ शकतो.

 या माध्यमातून किती मिळेल कर्ज?

यामध्ये बाईकची जी काही किंमत असेल त्यामधील 15% रक्कम तुम्हाला स्वतः खर्च करावी लागते व उर्वरित बाईकच्या एक्स शोरूम किमतीच्या 85% पर्यंतची कर्ज सुविधा ही बँकेमार्फत दिली जाणार आहे. एवढेच नाही तर कर्ज घेणारा उच्च निव्वळ वैयक्तिक किंवा संपत्ती असलेला ग्राहक असेल तर अशा व्यक्तींना 90% पर्यंत कर्ज मिळू शकते.

 या कर्जावर किती आकारले जाईल व्याज प्रक्रिया शुल्क?

स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत या योजनेअंतर्गत कमीत कमी दोन लाख 50 हजार रुपये पर्यंतचे कर्ज तुम्हाला मिळू शकते व या कर्जाची परतफेड करण्याची मुदत ही पाच वर्षाची आहे. एसबीआय सुपर बाईक कर्जाचा व्याजदर हा कमीत कमी 10.25%( एक वर्ष एमसीएलआर + 25%) प्रति वर्ष असेल.

जर स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक वर्षाचा एमसीएलआर पाहिला तर तो सध्या सात टक्के इतका आहे. या कर्जाच्या प्रोसेसिंग फी अर्थात प्रक्रिया शुल्काचा विचार केला तर ते कर्ज रकमेच्या एक टक्के आणि प्लस जीएसटी इतका असणार आहे. साधारणपणे प्रक्रिया शुल्क रुपये दहा हजार व अधिक जीएसटी यापेक्षा जास्त असणार नाही.

अशा पद्धतीने एसबीआय सुपर बाईक कर्ज योजनेतून तुम्ही तुमच्या सुपर बाईक खरेदीची इच्छा पूर्ण करू शकता.

Ajay Patil