अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- जिल्ह्यात यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस पडला आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. यातच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागातून एक महत्वाची माहिती समोर येत आहे.
उत्तर नगर जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या ठरणार्या निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी 100 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. ही रक्कम 31 मार्च 2021 पर्यंत खर्च करावी लागणार आहे. तसेच पूर्वीची देणी देण्यासाठी हि रक्कम खर्च करण्यात येणार आहे.
पुढील आर्थिक वर्षासाठी 375 कोटी रुपये डिसेंबर 2021 पर्यंत खर्च करावे लागणार आहेत. पुढे निधीची गरज पडल्यास या दरम्यान होणार्या अधिवेशनात पुरवणी मागणीत तो मागता येईल. या निधीतून मार्च 2022 पर्यंत कालव्यांची कामे मार्गी लागणार असल्याने लाभक्षेत्रात स्वागत करण्यात येत आहे.