file photo

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- शहरासह जिल्ह्यात सुरु असलेल्या बिंगो व ऑनलाईन मॅचचा जुगार बंद होण्यासाठी पोलिसांकडे तक्रार केल्याप्रकरणी शहरातील वकिलावर प्राणघातक हल्ला झाला आहे.

सोमवार दि.6 सप्टेंबर रोजी रात्री ऍड. हर्षद चावला (रा. मिस्कीननगर, सावेडी) घरी जात असताना त्यांच्यावर अज्ञात तीन व्यक्तींनी हा हल्ला केला.

याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ऍड. हर्षद चावला बेलेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी गेलो होते.

दर्शन घेऊन घरी जात असताना मोटारसायकलचे पेट्रोल संपल्याने एसपी ऑफिस जवळील टॉपअप पेट्रोल पंम्पावर पेट्रोल भरुन औरंगाबाद महामार्गाने नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्याने घरी जात असताना

शासकीय विश्राम गृह परिसरात अचानक अज्ञात इसमांनी त्यांची गाडी अडवूनशिवीगाळ करीत धारदार शस्त्राने हल्ला केला.

महेंद्र माखिजा व किसन माखिजा यांच्या विरोधात बिंगो जुगार प्रकरणी पोलीसात तक्रार केल्याने हा हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.

या मारहाणत ऍड. चावला यांच्या डाव्या हाताला धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून, सध्या ते एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.