ताज्या बातम्या

निवडणुका पुढे ढकलण्याची भाजपचीही मागणी, पण दिले हे कारण

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra news:ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी सर्वपक्षीय मागणी होत आहे. मात्र, सुप्रिम कोर्टाने आदेश दिलेला असल्याने या कारणासाठी त्या पुढे ढकता येणार नाहीत.

त्यामुळे भाजपने आता पावसाचे कारण शोधल आहे.राज्यामध्ये सध्या ठिकठिकाणी अतिवृष्टी होत असून नदी – नाल्यांना पूर आल्यामुळे स्थानिकांचा संपर्क तुटला आहे. अशा स्थितीत राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषदा, ४ नगर पंचायती व १५ ग्रामपंचायतींमधील निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांना केली.

ज्या भागात कमी पर्जन्यमान असते, त्या भागातील निवडणुका आयोगाने अलीकडेच जाहीर केल्या आहेत. मात्र, नेमका पाऊस सुरू झाल्याने जेथे निवडणुका आहेत, तेथेही पाऊस आहे. हे कारण पुढे करून भाजपने ही मागणी केली आहे.

ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय होऊ नयेत, अशी भाजपाची भूमिका असून निवडणुका पुढे ढकलल्यास हे आरक्षण पुन्हा लागू करण्यास सवड मिळेल, असेही पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

Ahmednagarlive24 Office