अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- दि. १४ ऑगस्ट रोजी श्रीगोंदा येथे माऊली संपर्क कार्यालय येथे भाजपा अहमदनगर दक्षिण जिल्हा अध्यक्ष मा.श्री अरुणजी मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपा उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री मा.श्री. रविजी अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियानांतर्गत बुथ आढावा बैठक आयोजित केली होती.
यावेळी बोलताना आमदार पाचपुते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे संघटन व विचार तळागाळात पोहोचवण्याचे महत्वाचे काम बुथप्रमुखांचे आहे. गावातील समस्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहचवण्याचे व त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे कार्य उत्कृष्टपणे श्रीगोंदा तालुक्यातील बुथप्रमुख, सर्व पदाधिकारी व तालुकाध्यक्ष संदिप नागवडे करत आहेत.
लवकरच महाराष्ट्रात फडणवीस साहेब आपल्याला मुख्यमंत्री पदी दिसतील त्यामुळे सर्वांनी पक्ष देईल ती जबाबदारी व देईल ते काम जोमाने पार पाडा व पक्षवाढीसाठी प्रयत्नशील रहा असे पाचपुते म्हणाले. रविजी अनासपुरे यांनी बुथप्रमुखांची भूमिका, तळागाळातील लोकांपर्यंत पोहचुन त्यांना पक्षाच्या विचारधारेशी कसे जोडता येईल,
पक्षाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काय व कसे प्रयत्न करता येतील हे सविस्तरपणे उपस्थित सर्व बुथप्रमुखांना समजावून सांगितले. १५ ऑगस्ट २०२१ हे वर्ष भारत देश अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करत आहे. यानिमित्ताने भाजपा च्या सर्व पदाधिकार्यांनी या उत्सवात आपला सहभाग नोंदवण्याचे आव्हान अनासपुरे यांनी केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना मुंडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करत त्यांना शाबासकीची थाप दिली.
ठाकरे सरकार हे इतिहासातील सर्वात निष्क्रिय सरकार असुन ते कोरोना महामारीच्या नावाखाली स्वतःची कातडी वाचवण्याचे काम करत आहे यामुळे महाराष्ट्र विकासात अनेक वर्षे मागे गेला आहे. प्रास्ताविक भाजपा श्रीगोंदा तालुकाध्यक्ष संदिप नागवडे यांनी तर आभार सुहासिनी गांधी यांनी मानले.
यावेळी आ.पाचपुते, भानुदासजी बेरड सर, दिलीप भालसिंग, अशोकराव खेडकर, संतोषसाहेब लगड, बाळासाहेब महाडिक, संतोष रायकर, संदीप नागवडे, दत्ताभाऊ हिरणावळे, बापुतात्या गोरे, दत्तात्रय कोठारे, अशोक खेंडके, शहाजी खेतमाळीस,
सुहासिनी गांधी, सुप्रिया पवार, मनीषा लांडे,अनुजा गायकवाड,सुनिलतात्या दरेकर, नितीन नलगे, राजेंद्र उकांडे, ईश्वरे गुरुजी, दिपक शिंदे, रोहित गायकवाड, अमोल अनभुले, सह तालुक्यातील बुथप्रमुख उपस्थितीत होते.