अहमदनगर जिल्ह्यातील ‘ या’ तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-आपले सुख-दु:ख बाजूला ठेवून तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतांना तळागाळातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे असलेली

तळमळ पाहून त्यांच्या कार्यपद्धतीने प्रेरित होवून भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका सरचिटणीस राजेंद्र खिलारी यांच्यासह दिगंबर जाधव, अजिनाथ खटकाळे, बबनराव भवर, रमेश खटकाळे, रामभाऊ खटकाळे, विजय भवर,

अरुण कर्डक आदी कार्यकर्त्यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. कोपरगाव येथे गौतम बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्यात आमदार आशुतोष काळे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या उज्वल भविष्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे नेतृत्व सोपविले आहे.

पक्षाने आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीची जाणीव नेहमी डोळ्यासमोर ठेवून अल्पावधीतच मतदार संघाची विकासकामे मार्गी लावल्यामुळे अनेक पक्षातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्त्यांनी आ.आशुतोष काळे यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

निवडून आल्यापासून दिडच वर्षात कोरोनाच्या जीवघेण्या संकटात देखील मतदार संघातील अनेक गावात विकास कामे सुरु आहेत हि त्यांची जमेची बाजू आहे त्यामुळे कोपरगावचे भविष्य सुशिक्षित,

सुसंस्कृत व विकासाचे व्हिजन असलेल्या आ.आशुतोष काळे यांच्या हातात सुरक्षित असल्यामुळेच आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे यावेळी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब बारहाते, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, शिवाजीराव शेळके, रामदास खटकाळे,

भाऊसाहेब गोडसे, निवृत्तीराव भवर आदी उपस्थित होते. राजकारणात पक्षापेक्षा विचार, विचारापेक्षा प्रगती आणि प्रगतीपेक्षा आचार अतिशय महत्वाचे असतात. समाजासाठी जो आपले सुख-दु:ख बाजूला ठेवून

समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरु असतो. त्यांनी केलेल्या भगीरथ प्रयत्नातून मतदार संघाचा अतिशय जिव्हाळ्याचा गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न त्यांनी मार्गी लावल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना दुसरे काय अपेक्षित असते.

नेतृत्व कसे असावे याचे उत्तम उदाहरण आमदार आशुतोष काळे आहेत त्यांच्याकडे मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन आहे.- राजेंद्र खिलारी

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24