अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल झालेल्या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ व राज्यभर अनेक ठिकाणी समाजकंटकांकडून भाजपा कार्यालयाच्या झालेल्या
तोडफोडीच्या निषेधार्थ श्रीरामपूर भाजपाच्या वतीने गांधी चौकात बुधवारी निदर्शने करून ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, अभिजित कुलकर्णी, गणेश मुदगुले, शहराध्यक्ष मारूती बिंगले, तालुकाध्यक्ष बबन मुठे, शशिकांत कडूस्कर, राजेंद्र कांबळे,
जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, सतिश सौदागर, रामभाऊ तरस, जिल्हा सचिव अनिल भनगडे, जिल्हा महिला मोर्चाच्या सरचिटणीस सुप्रिया धुमाळ, अनिता शर्मा, माधुरी ढवळे, भटक्या विमुक्त आघाडीचे विठ्ठल राऊत, सांस्कृतिक आघाडीचे बंडुकुमार शिंदे, विशाल यादव, अक्षय वर्पे, रूपेश हरकल,
अक्षय नागरे, युवा मोर्चाचे हंसराज बतरा, सागर ढवळे, रवी पंडीत, अमोल अंबिलवादे, राकेश यादव, विजय आखाडे, मिलींदकुमार साळवे, किसान मोर्चाचे गोविंद कांदे, योगेश ओझा, गणेश अभंग, पंकज करमासे, योगेश राऊत, मच्छिंद्र हिंगमिरे, डॉ. ललित सावज, साजिद शेख, प्रफुल्ल डावरे, विशाल आंभोरे, निलेश गिते,
ललित गाडेकर, मधुकर गवारे, किरण जगताप, अहमद शेख, गौतम जावरे, अरूण शिंदे, विजय देवकाते, मुकुंद हापसे, निशानाथ यादव, राकेश यादव, बापूसाहेब पवार, दत्तू देवकाते, अजित बाबेल, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दत्ता जाधव आदींनी हे आंदोलन केले. नायब तहसिलदार ज्योती गुंजाळ यांना निवेदन देण्यात आले.
केंद्रीय मंत्री राणे यांच्यावर झालेली कारवाई ही तालिबानी प्रकारची आहे. आजपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून संजय राऊत यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी असंसदीय भाषेचा वापर केला. मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. राणे यांना जेवन करताना अटक करण्यात आली.
ही कारवाई भारतीय संस्कृतीला धरून करण्यात आलेली नाही. यावरून आघाडी सरकार हे आपल्या सत्तेचा दुरूउपयोग करताना दिसत आहे. शिवाय राणे यांच्यावर कारवाई करून महाराष्ट्रात विविध ठिकाणी शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयावर हल्ले केले ही बाबही अत्यंत निंदनीय आहे. अशा शब्दात भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या