गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा एकटावली; केली जोरदार निदर्शने

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले असल्याचा आरोप मुंबईचे

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपाने आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले.

त्याच अनुषंगाने आज श्रीरामपूर मध्ये देखील आंदोलन करण्यात आले. शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्यासमोर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी यावेळी निदर्शने करण्यात आली. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे भाजपने हे आंदोलन केले.

राज्याच्या पोलीस दलाची प्रतिमा मलिन करण्याचे काम हे ठाकरे सरकारमधील मंत्री करीत आहेत, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. गृहमंत्री देशमुख यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्वरित राजीनामा द्यावा.

अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेऊन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. भारतीय जनता पक्षाच्या वतीने यापुढे उग्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24