भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज नगरमध्ये ; विरोधी पक्ष नेतेपदाचा तोडगा निघण्याची शक्यता

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :-  भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज (शुक्रवारी) नगर दौर्‍यावर येत आहेत. यावेळी मनपातील विरोधी पक्ष नेतेपदाचा विषयावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान नगरमध्ये मनपातील विरोधीपक्ष नेते पदावरून रस्सीखेच सुरु आहे. यामुळे वादाची परिस्थिती निर्माण झाली असून यावर आता प्रदेशाध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

तसेच मनपा विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे देखील स्पष्ट होऊ शकते.. महापालिकेत सत्ताबदल झाल्यानंतर विरोधात व 15 नगरसेवक असलेल्या भाजपकडे विरोधी पक्षनेतेपद येणार हे निश्‍चित आहे.

या पदासाठी महापौरपदावरून पायउतार झालेले बाबासाहेब वाकळे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी मनोज कोतकर यांनीही जोरदार हालचाली सुरू केल्या.

वाकळे आणि कोतकर यांनी आपल्याला पद मिळावे, यासाठी पक्षातील जास्तीत जास्त नगरसेवकांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र तथा भैय्या गंधे प्रयत्नशील आहेत. मात्र, त्यांचे प्रयत्न नगरसेवकांच्या सह्या मिळवून नव्हे तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसी चर्चा करून सुरू आहेत.

गंधे यांच्या नावाला सत्ताधार्‍यांचाही विरोध नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान या सर्व परिस्थितीवर प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या दौर्‍याला महत्व आले असून विरोधपक्ष नेत्यांच्या निवडीवर प्रदेशाध्यक्ष पाटील काय तोडगा काढणार याकडे भाजपसह नगर शहराचे लक्ष लागून आहे.

अहमदनगर लाईव्ह 24