अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचार, हत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
तसेच मंत्र्यांच्या चुकीचीही पाठराखण होत आहे. यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेत संतापाची भावना आहे. हा संताप भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी ट्विट करून व्यक्त केला आहे.
महाले यांचं हे ट्विट स्फोटक, खोचक, उपरोधिक आणि प्रचंड उद्वेग व्यक्त करणारं असून सरकारच्या जिव्हारी लागणारं असेच आहे. ‘पूजा चव्हाणने आत्महत्या केली,
हिरेन मनसुखने आत्महत्या केली, जळगावच्या ‘त्या’ महिलेने गर्मी होत होती म्हणून झगा काढून ठेवला होता.ज्यांच्यावर बलात्कार झालेत त्यात त्या महिलांची चुकी आहे, मुंडे, शेख,
वाघमारे, राठोड निरागस आहेत आणि राज्याला धोका सचिन, लतादीदी, अमिताभ, अक्षयकडून आहे’, अशा शब्दात महाले यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
राज्यात महिलांवर होणारे अत्याचार, हत्यांच्या घटना आणि सरकारकडून मंत्र्यांची होणारी पाठराखण यावरून राज्यात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.
भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी यावर हे ट्विट करून सरकारची लक्तरेच वेशीवर टांगली आहेत. महाले यांच्या ट्विटमधील प्रत्येक ओळ ही राज्यातील वास्तव परिस्थिती मांडणारी आहे.
स्त्रियांच्या वेदना मांडणारी आहे. तसेच सरकारच्या दांभिक कारभारावर बोट ठेवणारीही आहे. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएकडे जाईपर्यंत सर्व पुरावे नष्ट होण्याची शक्यता अधिक आहे. मग कुठलीही यंत्रणा लावा फार काही निष्पन्न होणार नाही,
असे आधीच्या सुशांत व दिशा प्रकरणावरून लक्षात येऊ शकेल. त्यामुळे चार दिवस न्यूज चॅनेलला टीआरपी मिळेल, एवढंच काय यातून निष्पन्न होईल’, असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.