भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे आभार मानले ! जाणून घ्या काय आहे कारण…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- कोरोना रोखण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी तालुक्यात विविध उपाययोजना केल्या. आरोग्य विभागाला आवश्यक मदत केली.

प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून परिस्थिती आटोक्यात आणल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार काळे यांचा गौरव करून आभार मानले.

यावेळी भाजपचे विनायक गायकवाड म्हणाले, आमदार काळे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केल्यामुळे संसर्गाला आळा बसण्यास मदत झाली.

५०० बेडचे कोविड केअर सेंटर, १०० ऑक्सिजन बेडचे कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटर, तसेच ग्रामीण रुग्णालयात ३० बेडचे आयसीयू डेडीकेटेड कोविड केअर सेंटर,

ग्रामीण रुग्णालयात व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यात ऑक्सिजन प्लँटची उभारणी करण्याचा त्यांचा निर्णय महत्त्वाचा होता.

योगेश वाणी म्हणाले, आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा, हे आमदार काळे यांनी कृतीतून दाखवून दिले. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला.

याप्रसंगी सुधाकर रोहोम, धरमशेठ बागरेचा, मन्नूशेठ कृष्णानी, विनायक गायकवाड, घोडके, सुरेश कागुणे, राजेंद्र खैरे आदी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24