अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- भारतीय जनता पक्षाचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोचवण्याच्या दृष्टीने भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर अहमदनगर येथील कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
मंगळवारी जाहीर केलेल्या नवीन कार्यकारिणीत सर्व तालुक्यातील विविध क्षेत्रात व भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्षापासून काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना जिल्हा कार्यकारणीमध्ये संधी देण्यात आली.
यानुसार सरचिटणीसपदी योगीराजसिंग परदेशी (संगमनेर), मंगेश शिंदे, कल्पेश पोगुल व राहुल दिघे ( संगमनेर ), शरद जाधव, अँड. स्वप्नील सोनवणे व सुभाष पवार ( नेवासे ), विशाल यादव (श्रीरामपूर),
सुनिल उगले (अकोले), नरेश सुराणा (शिर्डी) यांची उपाध्यक्षपदी रुपेश हरकल (श्रीरामपूर), रोहित वाकचौरे, रवींद्र कोते, सागर कापसे व शंकर गोंदकर ( राहाता ), तसेच सिध्दार्थ साठे ( कोपरगाव ) यांची नियुक्ती करण्यात आली.
भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, आमदार राधाकृष्ण विखे पाटील,
ज्येष्ठ नेते डॉ.भानुदास डेरे, स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड व बाळासाहेब मुरकुटे यांनी कार्यकारणी सदस्यांचे अभिनंदन करून भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.