दिलीप गांधी यांच्या निधनामुळे भाजपची मोठी हानी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे नेते दिलीप गांधी यांचे आज बुधवारी पहाटे नवी दिल्ली येथे निधन झाले. उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान माजी खासदार दिलीप गांधी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच होते. दिलीप गांधी हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळेस भारतीय जनता पार्टी कडून खासदार म्हणून निवडून आले होते.

दिलीप गांधी हे काही काळ केंद्रीय मंत्री होते. भाजप कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरू केली. नगर शहरात नगरसेवक ते खासदार असा प्रवास त्यांनी केला.

1999 मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. 2003 ते 04 या काळात केंद्रात राज्यमंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली.2009 आणि 20014 या लोकसभा निवडणुकीत ते नगर मतदारसंघातून लोकसभेत पोहचले.

यांना तब्यतीची तक्रार जाणवल्याने त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांची कोरोना चाचणी केली होती. त्यात त्यांना कोरोना असल्याचे निदान झाले होते.

मात्र, उपचारादरम्यानच त्याचे आज पहाटे दिल्लीतच निधन झाले. गांधी हे अहमदनगर दक्षिणमधून तीन वेळा खासदार म्हणून दिल्लीच्या संसद भवनात गेले होते.

केंद्रीयमंत्रीपदीही त्यांची वर्णी लागली होती. त्यांच्या निधनाने भाजपची मोठी हानी झाली आहे. अहमदनगरच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
  • #Former Union Minister Dilip Gandhi dies
अहमदनगर लाईव्ह 24