मुंबई : राज्यातील सत्तातर झाल्यापासून राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. सत्तेसाठी भाजप काहीही करु शकते, असे विरोधकांकडून पटवून दिले जात आहे. महाविकास आघाडीच्या अंतर्गत कलहामुळेच ही परिस्थिती आल्याचे भाजपकडून बोलले जात आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार असताना सत्तेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न संबंध राज्याने पाहिले. त्यामधून भाजपचा रावणासारखा अहंकार समोर येत असल्याचा आरोप आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
भाजप पक्ष नसून एक कुटुंब आहे. प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे आजारी असलेल्या मतदारांना देखील आणण्याची सोय पक्षाच्या माध्यमातून केली जात आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
दरम्यान, आज राष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. एनडीएकडून एका आदिवासी महिलेला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांना अधिक तर मते मिळतीलच पण विरोधकांनी लढण्यापूर्वीत शस्त्रे खाली ठेवली आहेत. शिवसेनेनेदेखील पाठिंबा दर्शवल्याने आता १८२ मते तर निविर्वाद होत आहेत. अपक्ष आणि उमदेवार पाहून आणखी १८ मते मिळण्यासाठी फार काही कसरत करावी लागणार नाही. त्यामुळे एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.