अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- मंत्री शंकरराव गडाख यांच्या अधिपत्याखाली असलेला मुळा सहकारी साखर कारखान्याने ऊसाला २८०० रुपये भाव द्यावा.
अन्यथा गेटवर आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला. महाराष्ट्र प्रदेश भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली मुळा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांना भेटून तसे निवेदन देण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी भेंडा येथे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली ऊसभाव वाढीसाठी उपोषण करण्यात आले होते. आता भाजपने आपला मोर्चा मुळा कारखान्याकडे वळविला आहे.
मागील गळित हंगाम मोठा झाला असून, साखर कारखान्याच्या उपपदार्थ निर्मिती पण चांगल्या प्रमाणात झाली आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार एफआरपीप्रमाणे कारखान्याने २१०० रूपये भाव अदा केला असला
तरी भार्गव कमिटीच्या निकषानुषार उपपदार्थ निर्मितीतून पन्नास टक्के नफ्यातून शेतकरी सभासद वर्गाला २८०० रूपये उसदर अशी मागणी भाजपने केली आहे. येत्या आठ दिवसात मुळा कारखान्याच्या पदाधिकारी व व्यवस्थापनाने २८०० रूपये भाव देण्याबाबत निर्णय घ्यावा.
अन्यथा भाजप किसान मोर्चाच्या वतीने मुळा कारखान्याच्या गेटवर १२ जुलै सकाळी अकरा वाजता उपोषण करण्यात येईल.