अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ आता रावेर लोकसभा मतदार संघाच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
बुधवारी रात्री रक्षा खडसे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यात त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. अशी माहिती रखासदार रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील कार्यालयाकडून देण्यात आली.
खासदार रक्षा खडसे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यातून त्या बऱ्या झाल्या होत्या.
दरम्यान, रक्षा खडसे यांनी तीन दिवसांपूर्वी वाढीव वीज बील, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन मुक्ताईनगर येथे आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती.
त्यावेळी रक्षा खडसे यांच्या सोबत मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. आता खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या आंदोलना दरम्यान खासदार खडसे यांच्या संपर्कात आलेल्या सर्वाना कोरोना चाचणी करावी लागणार आहे.