भाजपच्या ‘ या’ तालुकाध्यक्षांचा राजीनामा!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12  जुलै 2021 :-  पाथर्डी तालुका भाजपा अध्यक्ष माणिक खेडकर यांनी पंकजा मुंडे व प्रितम मुंडे यांच्या समर्थनार्थ तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आपल्या राजीनामा पत्रात खेडकर यांनी म्हंटले की, भारतीय जनता पार्टीचा मी मागील 30 वर्षा पासुन मी सदस्य आहे . तेव्हा पासुन स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी पक्ष वाढवण्यासाठी कीती परीश्रम घेतले याला मी साक्षी आहे .

तसेच त्यांच्या नंतर आदरणीय पंकजाताई यांनी फक्त स्वतःच्या मतदार संघाचा विचार न करता पक्षाचे खासदार-आमदार निवडून आणण्याकरता राञ दिवस मेहनत घेतली आणि त्यांना निवडून आणले . याचा परिणाम त्यांच्या विजयावर झाला.

खर तर याचा विचार करून पक्षाने त्यांना विधान परिषदेवर घेऊन या सभागृहात विरोधी पक्षाचा नेता करायला हवे होते. परंतु पक्षाने अनेकांना त्यांची फारशी योग्यता नसताना राज्यसभेवर तसेच विधान परिषदेवर घेतले.

त्यावेळी आम्हा कार्यकर्त्याना वाटले पक्षाची काही अडचण असेल म्हणून आम्ही शांत राहीलो. परंतु अता जो मंञीमडळ विस्तार झाला त्यामधे प्रितम मुंडे यांची सर्व प्रकारची योग्यता असूनही डावलण्यात आले असल्याचे दिसत असल्याचे खेडकर यांनी म्हंटले आहे.

त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील माझ्यासहीत भाजपचे सर्व कार्यकर्ते नाराज झाले असुन पंकजा मुंडे यांच्यासोबत आम्ही अहोत हे पक्षाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मी भाजपा तालुकाध्यक्ष आणि पक्षाच्या इतर सर्व पदाचा राजीनामा दिला आहे.

तसेच लवकर पञकार परिषद घेऊन आमची भुमिका मांडणार असल्याचे खेडकर यांनी म्हंटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24