अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-साखरे बरोबरच अनेक उपपदार्थांची निर्मिती करण्यात अग्रेसर असलेल्या काळे व कोल्हे सहकारी साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्लॅन्ट सुरू करून
तालुक्याला दिलासा द्यावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की , कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कै ग.र.औताडे व कै बगाजी देवकर यांनी कोपरगाव तालुक्यात कोळपेवाडी व संजीवनी सहकारी साखर करण्याची उभारणी केली असून
जेष्ठ नेते कै शंकररावजी काळे व माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या समर्थ नेतृत्वाखाली या कारखान्यांनी राज्यात नावलौकिक मिळवला आहे त्याच प्रमाणे साखरे बरोबरच अनेक उप पदार्थांची निर्मिती या कारखान्यात सुरू आहे ,
त्याचा खूप मोठा महसूल दर वर्षी शासनाला दिला जातो. गेल्या वर्ष भरात देशात करोना साथीच्या आजाराने थैमान घातले असून आता तालुक्यात भीषण रूप धारण केले आहे.
कोपरगाव तालुक्यात सुसज्ज कोविड सेंटर सुरू झाले असले तरी दिवसेंदिवस अनेक रुग्ण दगावत आहे.वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने परिस्थिती गंभीर होत असून केवळ ऑक्सिजन अभावी अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत.
सद्या तरी बाहेरून मिळणाऱ्या ऑक्सिजन वर रुग्णांना दिलासा देण्याचे काम सुरू आहे नुकतीच औद्योगिक वसाहतीचे चेअरमन व जिल्हा बँकेचे सदस्य विवेक कोल्हे यांनी संगमनेर तालुक्यातील ऑक्सिजन निर्मिती कारखान्याला भेट देऊन
ऑक्सिजन निर्मिती सुरू करणार असल्याचे सांगितले मात्र सदर कारखाना संगमनेर तालुक्यात असल्याने त्या भागातील गरज पूर्ण झाल्या नंतर कोपरगाव तालुक्याला ऑक्सिजन पुरवठा होऊ शकतो
मागील वर्षी साथ आल्यानंतर या दोन्ही कारखाना कार्यक्षेत्रात सॅनिटायझर निर्मिती सुरू केली व तालुक्यात वाटप केले होते. मात्र या दोन्ही सहकारी साखर कारखान्याकडे जागा यंत्र सामग्री व कामगार उपलब्ध आहेत.
तसेच या कारखाण्याच्या अधिपत्याखाली अनेक उप पदार्थ निर्मिती केली जाते मात्र सद्याची परिस्थिती पहाता या काळे व कोल्हे कारखान्यांनी ऑक्सिजन प्लॅन्ट सुरू करता येऊ शकतो का यावर विचार करून त्वरित प्लॅन्ट उभारणी करावी असे
आवाहन या पत्रकात लोक स्वराज्य आंदोलनाचे सोमनाथ म्हस्के,किरण अढांगळे, गोपीनाथ ताते ,सुजल चंदनशिव ,पप्पू वीर ,बाळू पवार आदींनी केले आहे.