अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-पोलिसांसमोर एकावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळी शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात घडली आहे.
याबाबत दुपारी उशिरापर्यत खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आरोपी राजू मुरलीधर काळोखे याने साहेबराव काते यांच्यावर हल्ला केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शुक्रवारी दुपारी आरोपी काळोखे आणि काते यांच्यात वाद झाले होते.
किरकोळ वादातून झालेल्या भांडणाचे शुक्रवारी तोफखाना पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शनिवारी तोफखाना पोलिसांनी दोघांनाही प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते.
ठाण्यात आल्यानंतर दोघांमधील वाद आणखी चिघळला व त्यानंतर काते याच्यावर काळोखे याने हल्ला केला. विशेष म्हणजे तोफखाना पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार कक्षात ही घटना घडली.
वार झाल्यानंतर ठाणे अंमलदार कक्षात मोठ्या प्रमाणात रक्त पडलेले होते. वार करणार काळोखे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.